हेल्मेट नाही, मग निबंध लिहा, नाशिक पोलिसांची जागरुकता मोहीम
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 11 Jan 2017 05:05 PM (IST)
नाशिक : नाशिकमध्ये आज पोलिसांनी वाहतूक जागरुकता मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत नाशिक वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांकडून दंडाऐवजी निबंध लिहून घेतला. नाशिकमधील मायलन-मुंबई नाका सर्कलवर पोलिसांनी जवळपास 1300 वाहनचालकांना विनाहेल्मेट पकडलं. पोलिसांनी 500 रुपयांचा दंड किंवा हेल्मेटच्या वापराचे फायदे या विषयावर निबंध लिहिण्याचा पर्याय वाहनचालकांना दिला. यावेळी 1100 वाहनचालकांनी निबंध लिहिण्याचा पर्याय निवडला, तर 12 वाहनचालकांनी दंड भरणं पसंत केलं. 147 वाहनचालकांनी लगेच हेल्मेट विकत घेऊन पोलिसांना आणून दाखवलं. नाशिक पोलिसांच्या या आगळ्यावेगळ्या मोहिमेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. नागरिक आणि वाहनचालकांमधून नाशिक वाहतूक पोलिसांच्या या मोहिमेबद्दल कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.