खेळताना पोटात काच घुसल्याने नाशकात चिमुरड्याचा मृत्यू
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 10 Jan 2017 11:23 AM (IST)
नाशिक : घरात खेळताना काच फुटून पोटात घुसल्याने चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील आडगाव परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. साईश वाबळे हा 4 वर्षांचा चिमुकला घरात खेळत होता. खेळत असतानाच तो काचेच्या दरवाजावर आपटला. काचेवर आदळल्यानंतर काच फुटली आणि साईशच्या पोटात घुसली. काचेचे तुकडे पोटात गेल्याने चिमुकला गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर साईशच्या वडिलांनी त्याला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.