त्यातूनच नाशिकरोड परिसरात एका वाईनच्या दुकानात कारवाईसाठी गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना, व्यावसायिकाने चक्क दहा हजार रुपयांची चिल्लर दिली. संबंधीत व्यावसायिकाला याआधी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. पुन्हा त्याच्याकडे प्लास्टिक सापडल्याने दंडाची रक्कम दुप्पट होऊन 10 हजार झाली.
मात्र हेतूपुरस्सर कारवाई केली जात असल्याचा समज झाल्यानं, या व्यावसायिकाने मनपा कर्मचाऱ्यांची खोड मोडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या हातात चिल्लर ठेवली. मात्र एव्हढी रक्कम मोजता मोजता त्यांच्या नाकीनऊ आले.