नाशिक: नाशिक-मुंबई विमानसेवेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून वेळापत्रकानुसार नियमित सेवा सुरु होणार आहे.


नाशिककरांच्या मागणीनुसार ओझरहून सकाळी 6 वाजता विमान मुंबईच्या दिशेने उड्डाण घेणार आहे. हे विमान 6 वाजून 50 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. तर दुपारी 4 वाजून 55 मिनिटांनी मुंबईहून उड्डाण घेतलेले विमान पावणे सहाला नाशिकमध्ये पोहोचेल.

मग नाशिकहून पुण्याला 6 वाजून 5 मिनिटांनी विमान उड्डाण घेईल, तर पुण्याहून नाशिकच्या दिशेने 7 वाजून 5 मिनिटाने विमानाचे उड्डाण होणार आहे. रात्री पावणे आठला ते ओझर विमानतळावर येणार आहे

कधी तांत्रिक कारण, कधी पायलटची कमतरता, तर कधी स्लॉटची मर्यादा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिक- मुंबई, नाशिक- पुणे विमानसेवा रखडली होती. मात्र आता ती पुन्हा सुरु होत आहे.

एअर डेक्कनने त्यांच्या वेबसाईटवर 20 एप्रिलपासूनचे बुकिंग सुरु ठेवले आहेत.

बहुतांश नाशिककरांना विमानसेवा सुरु झाल्याबाबतची माहिती नव्हती.

नवीन वेळापत्रकानुसार उद्यापासून सेवा सुरळीत सुरु होणार आहे.  लोकांचा ओघ वाढावा यासाठी सवलतीच्या दरात काही तिकीटं ठेवले आहेत. निवडक प्रवाशांना अवघ्या 573 रुपयात मुंबई गाठता येणार आहे.

वेळापत्रक

  • ओझर-मुंबई : सकाळी 6 वा निघेल, 6.50 ला मुंबईत पोहोचेल

  • मुंबई-ओझर: दुपारी 4 वाजून 55 मिनिटांनी मुंबईहून उड्डाण, पावणे सहाला नाशिकमध्ये लँड

  • ओझर - पुणे - 6.5 मिनिटांनी उड्डाण, 7.05 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.