नाशकात 23 वर्षीय एनआरआय तरुणीवर गँगरेप झाल्याचा आरोप
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 16 Dec 2016 03:11 PM (IST)
नाशिक : नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात एका 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. गँगरेपच्या आरोपातून तिघा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुख्य संशयित मंगल सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर इतर दोघं आरोपी फरार आहेत. गुरुवारी रात्री मल्हारबाबानगर इथं पीडितेच्या मित्रानं पार्टीसाठी तिला स्वतःच्या घरी बोलावलं. त्यानंतर गुंगीचं औषध देऊन तिघांनी अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. यापूर्वीही नाशकातील सिडको परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडल्याने परिसरात खळबळ माजली होती.