नाशिक : कार्यालयाचा जाहीर लिलाव टाळण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर वर्गणीतून पैसा गोळा करण्याची वेळ आली आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने नाशिक महानगरपालिकेची 26 लाख 63 हजार रुपयांची घरपट्टी थकवली आहे.
वारंवार सूचना देऊनही मालमत्ता कर जमा न केल्याने महापालिकेच्या विविध कर विभागाने काँग्रेस कमिटीसह शहरातील 394 अस्थापनांना जप्तीची नोटीस बजावली आहे. 21 दिवसात थकबाकी भरली नाही तर मालमत्तेचा लिलाव करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
त्यातच काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेश पातळीवर याबाबत माहिती दिली होती. मात्र वरिष्ठ पदाधिकारीकडून कान टोचण्यात आल्याने 26 लाख 63 हजार एवढी मोठी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न स्थानिक पदाधिकाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे वर्गणी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र कायमच गटबाजीचं दर्शन घडवणारे काँग्रेसजन जप्तीची पर्यायाने लिलावाची नामुष्की टाळण्यासाठी केव्हा एकत्र येतात याकडे सामान्य कार्यकर्त्यांच लक्ष लागलं आहे.
काँग्रेस कार्यालयाला लिलावाची नोटीस, वर्गणीतून पैसे गोळा करण्याची वेळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Mar 2018 05:28 PM (IST)
वारंवार सूचना देऊनही मालमत्ता कर जमा न केल्याने महापालिकेच्या विविध कर विभागाने काँग्रेस कमिटीसह शहरातील 394 अस्थापनांना जप्तीची नोटीस बजावली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -