Maharashtra Nashik News: मी आरोप करत नाही, मी टीका करत नाही. परंतु जर एक कुटुंब आहे, तर कुटुंबामध्ये काय केलं, काय नाही केलं आणि काय चुकलं हे विचारण्याचा अधिकार बहिणीला असतो. सुहास कांदे भाऊ आहेत. म्हणून बहीण म्हणून त्यांना प्रश्न विचारणार असल्याचे ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सांगितले. 


ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज नाशिकमध्ये कृषीथॉन प्रदर्शनाला भेट देण्यासाठी नाशिकमध्ये होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. नाशिक, मालेगाव, नांदगाव या भागामध्ये महाप्रबोधनच्या सभा होणार आहेत. कारण या भागात दादा भुसे, सुहास भाऊ, हेमंत गोडसे हे सगळे भाऊ आहेत. या सगळ्या भावांना भेटणार आहे. कुटुंबात काय चुकलं हे विचारणार आहे. मात्र भावांचे संस्कार किती बिघडून गेलेत हे पण बघत आहोत. एकेकाळी शिवरायांचा बाळासाहेबांचा वारसा सांगणारे आमचे भाऊ आता भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला गेल्यानंतर त्यांचा स्वभाव बदललेला आहे आणि महिलांना हीन लेखण्याचा जो भाजपचा दृष्टिकोन आहे, तोच यांच्या अंगात किती भिनलेला आहे तेही दिसते आहे, असा टीकाही त्यांनी यावेळी केली. 


त्यापुढे म्हणाल्या की, आजचा दौरा अनौपचारिक आहे. नाशिक जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात तीन दिवस महा प्रबोधन सभेसाठी नाशिकमध्ये येणार आहे. यावेळी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांना भेटणार आहे. मी आरोप करत नाही, टीका करत नाही. मात्र प्रबोधन यात्रेतून कुटुंबात काय चुकलं हे विचारण्याचा बहीण म्हणून अधिकार आहे. मात्र सद्यस्थितीत भाजपच्या वळचणीला गेल्यानंतर भाऊ संस्कार हिन झाले आहे. इकडे सुहास कांदे नाराज, संभाजी नगरला संजय शिरसाठ नाराज असल्याचे दिसून येत आहे. 


सुषमा अंधारे नितेश राणे यांच्यावर म्हणाल्या की, आपला नीतू आणि नीलू प्रचंड आघाऊ आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाही. त्या दोघा भावांनी मागे विडिओ ट्वीट केला होता, मात्र तो व्हिडिओ जुना आहे. विचारांचं खंडन मंडन करावं लागतं. मात्र त्यांचा वैचारिक अभ्यास कमी आहे. त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत असा टोलाही अंधारे यांनी राणे कुटुंबियांना लगावला. 


राज्यपाल, फडणवीस, चित्रा वाघ यांच्यावर ताशेरे


सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत  गृहमंत्री राज्यपाल, फडणवीस आणि चित्रा वाघ यांना धारेवर धरले. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी आहे. एकाच पक्षाचे असल्या सारखे ते वागतात. एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो. मात्र काही लोक महिलांचा अपमान करूनही गुन्हा दाखल होत नाही. त्याचबरोबर राज्यपाल भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याचा आरोप आहेत. रामदेव बाबा महिलांविषयी हीन वक्तव्य केले. त्यावेळी अमृता फडणवीस उपस्थित होत्या, त्या काहीही बोलल्या नाही. मी असते तर तिथेच खडसावले असते. तर दुसरीकडे मुलींवर अत्याचार वाढत आहेत. नाशिकमध्ये वसतीगृहातील मुलीवर अत्याचार करण्यात आला. गृह मंत्री म्हणून फडणवीस कुचकामी असून सगळे खाते फडणवीस यांच्याकडे आहे.  याचा अर्थ भाजपच्या इतर लोकांना अक्कल नाही का? असा सवाल अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर केला. शिवाय एकेकाळी चपला मारण्याची भाषा करणारे माणसं, आता गळाभेट घेत आहे. फक्त स्वतःच्या राजकीय आकांक्षेसाठी पूजा चव्हाण हीचा विषय मांडला. पत्रकारांवार भडकून तुम्ही सत्तेचा माज दाखवत आहे. ज्या क्षणी त्या भाजपचा राजीनामा देतील, तेव्हा मी बहीण म्हणून उभी राहील, सल्लाही चित्रा वाघ यांना दिला. 


मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, आताचे मुख्यमंत्री कुठे मंत्रालयात जातात. कामाख्या देवी काय भस्मसात करेल काय. ते लोकं तिकडे जातील तेवढ्या वेळात राज्यात कोण लक्ष देईल. उद्धव साहेब घरी बसायचे असा आरोप तुम्ही करतात. पण आमचे एकनाथ भाऊ मंत्रालयात पण जात नाही. ते सतत गणपती, नवरात्र, आणि पितृ पक्षासाठी जेवायला जातात. त्यातून वेळ मिळाला की ते हात दाखवायला जातात.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik News: नाशिकमध्ये शिंदे गट पुन्हा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत!