नाशिक : नाशिकच्या मुर्तझा ट्रंकवालानं महाराष्ट्राकडून रणजी पदार्पणातच शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. मुतर्झा हा रणजी संघात पदार्पणातच शतक ठोकणारा नाशिकचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.


सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात मुर्तझा ट्रंकवालानं दुसऱ्या डावात 227 चेंडूंत 117 धावांची खेळी रचली. मुर्तझाच्या या शतकी खेळीत 22 चौकारांचा समावेश होता.

त्याच्या या दमदार खेळीमुळे महाराष्ट्राला या सामन्यात पराभव टाळण्यात यश आलं. इतकंच नाही तर महाराष्ट्रानं या सामन्यात एका गुणाचीही कमाई केली. मुर्तझानं या सामन्याच्या पहिल्या डावातही 64 धावांची खेळी केली होती.