नाशकात स्विमिंग करताना एसीपी शाळिग्राम पाटील यांचा मृत्यू
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 23 Oct 2016 05:00 PM (IST)
नाशिक : नाशकातील प्रशासन विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त शाळिग्राम पाटिल यांना पोहण्याचा सराव करताना हार्ट अटॅक आला. हा हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता, की त्यातच त्यांचं निधन झालं. नाशिकच्या सावरकर तरण तलावात ते आज सकाळी पोहोण्यासाठी आले. पोहोण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी मारली, पण पाण्यात जाताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि काही सेकंदातच त्यांची प्राणज्योत मालवली. महिन्याभरापूर्वीच ते रायगडमधून बदली होऊन नाशिकला जॉइन झाले होते. शाळिग्राम पाटील 57 वर्षांचे होते.