मुंबई / नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला बसणारे धक्के सुरुच आहेत. नाशिक मनसेला लागलेली गळती कायम असून मनसेचा आणखी एक नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागला आहे.
मनसेच्या नगरसेविका सुमन ओहोळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेबरोबरच विविध पक्षांच्या आजी-माजी नगरसेवकांनी शिवसेनेत पाऊल ठेवलं आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे.
एखाद-दुसरा नगरसेवक गेला असता, तर समजू शकतो पण इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक जात आहेत म्हणजे पक्षाच्या भूमिकेला हरताळ फासला जात असल्याचं स्पष्ट आहे, असं शिवसेनेचे नाशिक संपर्कप्रमुख आणि आमदार अजय चौधरी यांनी म्हटलं आहे.
आमच्यावर टीका करणाऱ्यांनी स्वतः पक्ष सोडताना ते लायक होते का ते आधी बघावं, आमची लढाई कुठल्याही एका पक्षाविरोधात नाही. जो विरोधात जाईल त्याच्या चारी मुंड्या चित करुन नाशकात भगवा फडकवू, असं आवाहन चौधरींनी दिलं आहे.
कोण-कोण शिवसेनेत?
रशिदा शेख, नगरसेवक, अपक्ष
त्र्यंबक गायकवाड, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी
विशाल पवार, उपशहरप्रमुख, राष्ट्रवादी
प्रशांत रकटे, सरचिटणीस, राष्ट्रवादी
श्रीराम गायकवाड, संचालक, व्यापारी बॅंक नाशिक