नाशिक : नाशिकच्या महापालिकेनं भंगारबाजारात आज सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली आहे. यात जवळपास 800 पेक्षा जास्त दुकानं जमीनदोस्त झाली आहेत. या कारवाईवेळी महापालिकेनं मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवला होता.

नाशिकच्या अंबड लिंक रस्त्यावर 30 ते 40 एकर परिसरात पसरलेलं भंगार मार्केट आज पालिकेनं जमीनदोस्त केलं आहे. गेली 17 वर्ष पालिका भंगार बाजारातील अतिक्रमणाविरोधात न्यायालयीन लढा देत होती. 2015 साली न्यायालयानं भंगार बाजार हलवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भंगार बाजारातील दुकानांना पालिकेनं अनेक वेळा नोटीस बजावली होती. मात्र नोटीस बजावूनही 800 दुकानांपैकी एकही दुकान जागचं हललं नव्हतं. त्यामुळे आज पालिकेनं धडक कारवाई करत हा भंगार बाजार उद्धस्त केला.

या कारवाईसाठी सुमारे 100 जेसीबी आणि पोकलेनचा वापर करण्यात आला. तसंच बंदोबस्तासाठी 1 हजार पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं होतं.

पाहा व्हिडीओ :