नाशिक: नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागातील बेपत्ता सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील हे आज सकाळी घरी परतले आहेत. महापालिकेतील अती कामाचा त्रास होत असल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ते गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होते. मात्र आज पहाटे ते घरी परतले.
रवींद्र पाटील हे गेल्या शनिवारपासून अचानक बेपत्ता झाले होते. महापालिकेतील अती कामाचा त्रास होत असल्याने आत्महत्या करत असल्याची चिट्ठी त्यांनी लिहिली होती. त्यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली होती.
महापालिकेकडून तातडीने पाटील बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. त्यामुळे 6 दिवसापासून बेपत्ता असलेल्या पाटील यांचा शोध पोलिस घेत होते. परंतु आज सकाळी पाटील हे सुखरूप घरी परतले आहेत.त्यामुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकऱण?
रवींद्र पाटील शनिवारी 26 मे रोजी सकाळी वॉक विथ कमिशनर कार्यक्रमासाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडले. मात्र थोड्या वेळाने त्यांची पत्नी फ्लॅटमधून खाली आल्यावर, त्यांना रवींद्र पाटील यांची गाडी पार्किंगमध्येच दिसली. त्यात मोबाईल,न डायरी आणि एक चिट्ठी आढळून आली.
या चिट्ठीत कामाच्या अधिक ताणामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद होती.
त्यामुळे घाबरलेल्या पाटील कुटुंबीयांनी तातडीने पोलिसात धाव घेत, फिर्याद दिली. पोलिसांनी गाडीची पाहणी करून, धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही.
पाटील यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली.
ग्रीन फील्ड लॉन्सवरच्या कारवाईमुळे महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही, अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती. या कारवाईमुळे महापालिकेत एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याची स्पर्धा सुरु झाली. त्याच तणावातून रवींद्र पाटील घराबाहेर गेल्याची चर्चा नाशिकमध्ये होती.
नाशिकचे बेपत्ता सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील घरी परतले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jun 2018 09:25 AM (IST)
रवींद्र पाटील हे महापालिकेतील अती कामाचा त्रास होत असल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ते गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -