नाशिक : महिलांकडे बघून अश्लील वर्तन करणाऱ्या नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमधील ही घटना आहे. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या मुलाला पोलिसांनी अटक केली.


सिडकोतील कामठवाडा परिसरात राहणाऱ्या शिक्षिका आपल्या घरातील बेडरुममध्ये लिखाण काम करत असताना संशयित मुलगा बेडरुमच्या खिडकीबाहेर आला. त्याने शुक-शुक करत या शिक्षिकेचं लक्ष वेधून हस्तमैथून करण्यास सुरुवात केली.

हा किळसवाणा प्रकार बघताच या शिक्षिकेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली आणि या मुलाने पळ काढला.

संबंधित शिक्षिकेने तात्काळ अंबड पोलीस ठाणे गाठत याबाबत सविस्तर तक्रार नोंदवली. पोलिसांनी या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं आणि समज देऊन वडिलांच्या ताब्यात दिलं.

या मुलाने सिडको परिसरातच आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा महिलांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांना कारवाई करण्यास अडचणी येत आहेत.

दरम्यान, अल्पवयीन मुलांचं गुह्यातील वाढतं प्रमाण हा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.