नाशिक: मनमाड-येवला राज्य महामार्गावर (Manmad Yeola Highway Accident)  स्विफ्ट कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून कारमधील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अंकाईजवळील रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात घडला घडला. अपघातातील सर्व प्रवासी हे नाशिकमधील गंगापूर या ठिकाणचे आहेत. 


रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव असून पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी आहेत. मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम उरकून येवला मार्गे नाशिककडे परतत असताना हा भीषण अपघात झाला. अपघातात कार अक्षरशः चक्काचूर झाली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या अपघाताच्या वेळी अवकाळी पाऊस आणि रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्य राबवण्यास अडथळा येत होता. त्यामुळे वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती.


सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बसचा अपघात


सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरुन धावणाऱ्या एसटी बसला अपघात झाला आहे. या एसटी बसचे मागचे  चाकं निखळले.  या बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आहे. सोलापुरातील उळे-कासेगाव येथे हा थरार अनेक प्रवाशांनी आज अनुभवलाय.  अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून येथून  ही एसटी बस नांदेडकडे निघाली होती. या बसमधून किती प्रवासी प्रवास करत होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सोलापुरातील उळे-कासेगाव  येथे अचानक  एसटी बसचा जॉईंट तुटून चाक निखळल्याने हा अपघात  झाला. ही बस तिरकी होऊन रस्त्यावरच एसटी बस पलटी झाली. अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.सर्व जखमींना जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.    


डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर 15-20 मिनिटात झाला अपघात


सोलापूर  डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर हा अपघात झाला आहे.  नशीब बलवत्तर म्हणून या सर्वांचे प्राण वाचले. बस थांबल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, या घटनेमुळे राज्य परिवहन महमंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही एसटी बस डेपोतून बाहेर पडताना तपासण्यात आली नव्हती का? असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात आला आहे.


ही बातमी वाचा: