नाशिक : पैसे खाली पडल्याची बतावणी करुन चोरट्यांनी 28 लाखांची रोकड हातोहात लंपास केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. गंगापूर रोडवरील सारस्वत बँकेत पैसे भरायला जात असताना ही घटना घडली.


शरणपूर रोडवरील एका नामांकित सराफा व्यायसायिकाचे तीन ते चार कर्मचारी पैसे भरण्यासाठी बँकेत गेले होते. तेवढ्यात एका चोरट्याने तुमच्या नोटा खाली पडल्याचं सांगितलं. संबंधित कर्मचाऱ्याचं लक्ष विचलित होताच, आरोपीने पैशांची बॅग घेऊन धूम ठोकली.

दरम्यान, पैशांची बॅग घेऊन जाणारा चोरटा आणि त्याचे साथीदार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. परंतु चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाळत ठेवून पैशांची चोरी झाल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे बँकेचे कर्मचारी आणि सुरक्षारक्षकाच्या लक्षात कसं आलं नाही, असा सवाल विचारला जात आहे.

पाहा व्हिडीओ