नाशिक: नाशिकमध्ये 125 डेसीबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांना पोलिसांकड़ून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये बच्चे कंपनींसोबत तरुणांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
नाशिक पोलिसांनी आज 125 डेसीबलपेक्षा जास्त आवाजावरच्या फटाक्यावर बंदी घातली असून, दुकानात 450 किलोपेक्षा जास्त वजनाचे फटाके ठेवण्यास मनाई केली आहे. या 450 किलोपैकी 400 किलो रोशणाईचे आणि 50 किलो आवाजाचे फटाके विक्रीसाठी ठेवण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी सर्व दुकानदारांना दिले आहेत.
नाशिक पोलिसांच्या या बंदी संदर्भातील निर्णयामुळे बच्चे कंपनींसोबतच तरुणांमध्येही मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ठाणे आणि मुंबईतही पोलिसांनी दिवाळीमध्ये फटाक्यांच्या आवाजवर मर्यादा घातली आहे. ठाणे पोलिसांनी आपटी बार, तडतड्या, उखळी बार आणि अॅटम बॉम्ब वाजविण्यावर बंदी घातली आहे.
तर मुंबईमध्ये निवासी भागांमध्ये विना परवाना फटाक्यांची दुकाने थाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
संबंधित बातम्या
आपटी बार, अॅटम बॉम्ब, तडतड्या वाजवू नका: ठाणे पोलीस
निवासी वसाहतीत विनापरवानगी फटाके स्टॉलवर कारवाई होणार