प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 18 Oct 2016 11:27 AM (IST)
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून धुमसणाऱ्या नाशिकमध्ये आता शांततेचे बोर्ड लागले आहेत. ''मी नाशिककर मला शांतता हवीय'', असे फलक नाशिकमध्ये दिसत आहेत. तळेगावातील चिमुलीच्या अत्याचारानंतर नाशिक आणि परिसरात बरीच तोडफोड झाली होती. त्यानंतर अनेक दिवस नाशिक अशांत होतं. शांत नाशिक अशी ओळख असणारं नाशिक हिंसक बनल होतं. या घडीला नाशिक पूर्वपदावर आहे. मात्र, यापुढे अशा घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून हे बोर्ड लावण्यात आले आहेत. नाशिकच्या कॉलेजरोडवर चौका चौकात 'मी नाशिककर, मला शांतता हवी आहे' अशा आशयाचे होर्डिंग्स लावण्यात आले असून, ते नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.