तितिक्षा राऊळ ही विद्यार्थिनी घरात पलंगावर झोका खेळत होती. त्यावेळी तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. झोक्याचा गळफास बसून तितिक्षाचा श्वास गुदमरला. तितिक्षाच्या वडिलांनी तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरु होण्यापूर्वीच तिला मृत घोषित केलं.
नाशकातील अंबडमधल्या चुंचाले शिवारात रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
आठच दिवसांपूर्वी नाशकातील त्र्यंबक तालुक्यातील हरसुल गावातही असाच प्रकार समोर आला होता, तर औरंगाबाद, मुंबईतही असाच प्रकार घडला होता. चिमुरड्यांवर खेळताना डोळ्यात तेल घालून नजर ठेवायला हवी, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.