धरणं तुडुंब भरल्याने नाशिकची तर पुढच्या वर्षभराची चिंता मिटलीच आहे. पण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह मुंबईलाही पुरेल असा पाणीसाठी धरणांमध्ये झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरणांची सद्यपरिस्थिती
- नाशिक जिल्ह्यात एकूण 24 धरणं आहेत.
- एकूण पाणी साठवण क्षमता - 65 हजार 814 दशलक्ष घनफूट
- सद्यस्थितीत धरणांमध्ये 78 टक्के म्हणजे 51 हजार 599 दशलक्ष घनफुटांपेक्षा अधिक पाणीसाठा
- गंगापूर धरण समुहात 95 टक्के, गिरणा धरण समुहात 78 टक्के तर पालखेड धरण समुहात 85 टक्के पाणीसाठी
- आळंदी, वाघाड, ओझरखेड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर या 8 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा
- गंगापूर 91 टक्के, दारणा 95 टक्के भरलं
- काश्यपी आणि गौतमी गोदावरी 99 टक्के तर करंजवण धरण 96 टक्के भरलं
- कडवा धरण 90 टक्के तर पुनद धरण 85 टक्के भरलं
- मुंबईला पाणी पुरवठा करणारं अप्पर वैतरणा धरणंही ओव्हरफ्लो
- धरणं फुल्ल झाल्याने आतापर्यंत 46 टिएमसी पाणी नाशिक जिल्ह्यातल्या धरणांतून जायकवाडी धरणासाठी सोडण्यात आलं.