VIDEO: राज जे काही करतो ते पराकोटीचं असतं: नाना पाटेकर
एबीपी माझा वेब टीम | 27 Dec 2016 11:57 PM (IST)
नाशिक: 'राज जे करतो ते पराकोटीचं चांगल असतं.' असा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं. 'माणूस म्हणून मी राज तुमचा आभारी आहे. खूप छान काम केलं. अजूनही कुठल्या शहरात तू निवडून आला तर बर होईल. अशी छान काम तिथेही होतील.' असं म्हणत नाना पाटेकर यांनी राज ठाकरेंच्या कामाची प्रशंसा केली. दरम्यान, नाशिकमध्ये पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या बोटॅनिकल गार्डनचा लोकापर्ण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते. यावेळी अभिनेते भरत जाधव, पुष्कर क्षोत्री आणि दिग्दर्शक केदार शिंदेही उपस्थित होते. VIDEO: