त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी जातात. त्यात अनेक व्हीआयपींचा समावेश असतो. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. त्र्यंबकेश्वराच्या पूजेसाठी पुरोहित वर्ग मोठी दक्षिणा घेतात. सर्वत्र कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य असलं, तरी पूजेसाठी कोणत्याही ई-व्यवहाराची सोय नाही.
त्यामुळे आयकर विभाग पुरोहितांकडे येणाऱ्या पैशांवर बारीक नजर ठेवून होतं. याच पैशातून अनेक पुरोहित धनाढ्यही झाले आहेत. त्यामुळे आता आयकर विभागाने त्र्यंबकेश्वरच्या धनदांडग्या पुरोहितांकडे आपला मोर्चा वळवल्याचं कळतं.
आयकर विभागाचा छापा पडल्याचं समजताच अनेकांनी घरातील रोकड इतरत्र हलवण्यास सुरुवात आहे. ही रक्कम घेऊन जाणारी 15 ते 16 वाहनं ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र किती रक्कम ताब्यात घेतली, ही रक्कम कोणाची आहे याची चौकशी आहे. तसंच अनेक पुरोहितांची बँक खाती तपासली जात आहे. नोटाबंदीनंतर त्यांच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, याचा बँकांमध्ये तपास सुरु आहे.
पाहा व्हिडीओ