नाशिकमधील कारागृहात कैद्यांकडे मोबाइल, तीन अधिकारी निलंबित
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 26 Dec 2016 06:34 PM (IST)
नाशिक: नाशिक रोड कारागृहात पुन्हा एकदा मोबाईल सापडले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे मोबाईल वापर करणाऱ्या कैद्याकडून अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. शनिवारी ही घटना घडली आहे. नाशिक रोड कारागृहामध्ये बाबर नावाचे अधिकारी कैद्यांची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना दोन मोबाईल सापडले. त्यानंतर कैद्यांनी बाबर यांना मारहाण केली. दरम्यान, कारागृहातील मोबाईल जप्तीप्रकरणी तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कैलास भंवर, गणेश मानकर, सुनील कुंवर अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहेत. संबंधित बातम्या: नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून 16 महत्त्वाच्या कैद्यांना हलवणार