नाशिक: नाशिकच्या 31 प्रभागांतील 122 जागा स्वबळावर लढणाऱ्या मनसेनं 54 उमेदवारांसह आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यादी जाहीर करणारा मनसे हा एकमेव पक्ष ठरला आहे. मनसेच्या पहिल्या यादीत विद्यमान नगरसेवक, शिवसेना भाजपातून पक्षात आलेल्या इच्छुकांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांचीही वर्णी लागली आहे.



भाजप-शिवसेनेतल्या बंडखोरांसाठी मनसे हा पहिल्या पसंतीचा पर्याय मानला जातो आहे. त्यामुळे शिवसेना भाजप यादी जाहीर न करण्याची खबरदारी घेत असताना मनसेनं मात्र 54 जणांची पहिली यादी जाहीर केली.

स्थायी समिती सभापती सलीम शेख, नगरसेवक अनिल मटाले, संदिप लेनकर, सुरेखा भोसले, अर्चना जाधव यांच्यासह शिवसेनेतून आलेले अस्लम मणियार, भाजपतून आलेल्या ज्योती गांगुर्डे, सोमनाथ बोडके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.'



संबंधित बातम्या:

मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर अखेर शिक्कामोर्तब

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

नागपुरात गडकरी-मुख्यमंत्र्यांची बैठक, मात्र उमेदवार यादी नाहीच

उमेदवाराने आचारसंहिता भंग केल्यास थेट अॅपद्वारे तक्रार करा!