नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने 54 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवार शेवटचा दिवस असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एक दिवस अगोदर मनसेने यादी जाहीर केली आहे.




नाशिकमध्ये सध्या मनसेची सत्ता आहे. इथे 122 जागांसाठी निवडणूक होईल. गेल्या निवडणुकीत मनसेने 39 नगरसेवकांसह नाशिकमध्ये झेंडा फडकावला होता.



या निवडणुकीपूर्वी अनेक विद्यमान नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने मनसेसमोर नाशिक महापालिकेची सत्ता राखणं मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान मनसेची दुसरी यादी लवकरच जाही केली जाण्याची शक्यता आहे.