दरम्यान, काही वेळातच बच्चू कडू यांनी बॉम्बच्या वक्तव्यावर घुमजाव केलं. 'मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू म्हणजे सुतळी बॉम्ब टाकू. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. हिंसक वळण देण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. जे बोललो ते आक्रोशात बोललो. पण मुख्यमंत्री वैयक्तिक आम्हाला प्रिय आहेत.' असं म्हणत बच्चू कडूंनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, भाजपकडून बच्चू कडू यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. एबीपी माझाशी बोलताना भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी बच्चू कडू यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.
खरं तर बच्चू कडू वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी हेमामालिनी दररोज बंपर दारु पितात. अशीही टीका केली होती. तर रावसाहेब दानवेंची जीभ छाटू असं वक्तव्य ही त्यांनी केलं होतं.