नाशिक: 'दिल्ली हादरली पाहिजे असं आंदोलन करा', असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. नाशिकमधील सुकाणू समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
'आता भाजपमध्ये इन कमिंग नाही, तर आऊट गोईंग होईल.' अशी टीकाही यावेळी राजू शेट्टी यांनी भाजपवर केली. तसंच आपण सत्तेतूनही लवकरच बाहेर पडू असंही यावेळी राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, कर्जमाफीबाबत आपण चर्चेची दारं अजूनही बंद केली नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नाशिकमध्ये आज सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीदरम्यान सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. मागण्या मान्य न झाल्यास 12 जून रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढू. तसंच 13 जूनला राज्यभरात रेलरोको करु असा इशारा सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.
कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमी भावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन यापुढे कसं असणार आहे, यासाठी नव्याने स्थापन झालेल्या सुकाणू समितीची नाशिकमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, शेकाप नेते जयंत पाटील, आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील हे हजर आहेत.
संबंधित बातम्या:
सुकाणू समितीच्या बैठकीत सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम
नाशकात सुकाणू समितीच्या बैठकीत आगंतुक महिलेचा गोंधळ
शेतकरी संप देशस्तरावर नेणार: खा. राजू शेट्टी
सुकाणू समितीच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरणार