मालेगाव: नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महापालिकेच्या महासभेत आज चांगलाच गोंधळ झाला. इतिवृत्त मंजुरी आणि अंदाजपत्रक दुरुस्तीचे अधिकारावरुन महापौर आणि उपमहापौरांमध्ये जुंपली.


 

संतापलेल्या उपमहापौर युनुस ईसा आणि त्यांच्या दोन मुलांनी थेट स्थायी समिती सभापती एजाज बेग यांना मारहाण केल्याचीही घटना घडली. या घटनेनंतर महापौरांनी सभा तीन दिवसांसाठी तहकुब केली आहे.

 

काही दिवसांपूर्वीच युनुस ईसा यांचा स्थायी समिती सभापती निवडणुकीत पराभव झाला. त्या रागातून ईसा आणि त्यांचे चिरंजीव आणि माजी महापौर अब्दुल मलिक आणि माजिद ईसा यांनी ही मारहाण केल्याची चर्चा सुरु आहे.