नाशिक : नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात दिसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलं आहे. आज सकाळी नाशिक रोडवरील सदगुरु नगर परिसरात या बिट्याने नागरिकांवर हल्ला केला होता. यात एक नागरीक जखमी झाला होता. परंतु, वनविभागाच्या अथक परिश्रमानंतर हा हल्लेखोर बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि नाशिककरांचा जीव भांड्यात पडला.
मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना आज सकाळी नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात बिबट्याने दर्शन दिले होते. या बिबट्याने परिसरातील नागरिकांवर हल्ला देखील केला होता. यात सुधीर क्षत्रिय हे नागरिक जखमी झाले होते. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु, आता वन विभागाने त्याला पकडल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत वन विभागाचे आभार मानले आहेत.
बिबट्याच्या दर्शनानंतर स्थानिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली होती. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तत्काळ बिवट्या असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि बिबट्याचा शोध घेतला. बराच वेळ या बिबट्याने पथकाला चकवा दिला पण दोन-तीन तासांच्या शोध मोहिमेनंतर त्याला पकडण्यात वन विभागाला यश आले.
नाशिक रोडवरील संगीता गायकवाड या गृहिणी अंगणात कपडे धुवत असताना बिबट्याने त्यांना स्पर्श केला आणि त्यानंतर गाडी खाली जाऊन बसला. त्यामुळे संगीता गायकवाड या प्रचंड घाबरल्या. त्यांनी भीतीने घरात जाऊन दार बंद केले.
"बिबट्याने स्पर्श केल्यानंतर डोळ्यात पाणी तर अंगावर काटा आला. सद्गुरू कृपेने आज मी वाचले अशी प्रतिक्रि संगीता गाईकवाड यांनी या घटनेनंतर दिली.
अलिकडे जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये शिरकाव वाढला आहे. प्राण्यांचा जंगलातील अधिवास कमी होत असल्याने ते अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे फिरकताना दिसत आहेत. परंतु, प्राण्यांच्या मानवी वस्तीतील वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
Union Budget, Economic Survey 2022 LIVE Updates : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...