नाशिक : हजारो गुंतवणूकदारांना गंडा घालून कोट्यवधींची माया जमावणाऱ्या भाऊसाहेब चव्हाणाचं घबाड जगासमोर आलं आहे. नाशिक पोलिसांनी भाऊसाहेब चव्हाणच्या बँक लॉकरची झाडाझडती घेतल असून त्यातून 6 किलो सहाशे ग्रॅम सोन्याची नाणी सापडली आहेत.   दरम्यान, आज पोलीस भाऊसाहेबला घेऊन बँकेत हजर झाले. मात्र भाऊसाहेबकडे असलेल्या चावीनं बँकेचा लॉकर उघडला नाही. त्यामुळे पोलीस भाऊसाहेबला घेऊन एसबीआय बँकेच्या शाखेत गेले. तिथं देखील भाऊसाहेब चव्हाणचं खातं असून तिथल्या लॉकरमध्ये काय सापडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.   भाऊसाहेब चव्हाणची अनेक बँकेत खाती असून, कोणत्या खात्यात किती काळी कमाई लपवली याचा लवकरच उलगडा होणार आहे. मुंबईतल्या विमानतळावर नाशिक पोलिसांनी भाऊसाहेब चव्हाणला अटक केल्यानंतर सत्र न्यायालयाने त्याला 13 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.