नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेला शहरातील पहिला गोविंदनगर परिसरातील रुग्णही बरा होऊन घरी गेल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शहर लवकरच कोरोनामुक्त होईल असं दिसून येत असतानाच शनिवारी अचानक शहरात सहा नवे रुग्ण मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. बेकायदेशीररित्या घुसखोरी केलेल्या नागरिकांमुळे नाशिककरांचे आरोग्य धोक्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. कारण हॉटस्पॉट असलेल्या मालेगावसह इतर जिल्ह्यातून शहरात दाखल झालेले नागरिक कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले आहे.


नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असतानाच दुसरीकडे नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे नाशिककरांसोबत पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून समाधान व्यक्त केलं जात होत. दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेला शहरातील पहिला गोविंदनगर परिसरातील रुग्णही बरा होऊन घरी गेल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शहर लवकरच कोरोनामुक्त होईल असं दिसून येत असतानाच शनिवारी अचानक शहरात सहा नवे रुग्ण मिळून आल्याने खळबळ उडाली. सिडको, सातपूर, हिरावाडी, पाथर्डी फाटा, देवळाली या परिसरातील ते रहिवासी आहेत. यात एका लष्करी जवानासह एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून जिल्हा रुग्णालयातील एका सरकारी डॉक्तरलाही कोरोनाची लागण झाली आहे.


राज्य सरकारचा मोठा निर्यय! रेड झोनमध्येही कंटेनमेंट झोन वगळता दारु विक्रीची परवानगी


बाहेरुन आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण


धक्कादायक म्हणजे सिडको, सातपूर आणि हिरावाडी परिसरातील तीन रुग्ण हे कोरोना बाधित क्षेत्रातून नाशिकमध्ये दाखल झाल्याचं समोर आलं आहे. सिडको परिसरातील व्यक्ती हा जळगावच्या भडगावहून दुधाच्या टँकरने छुप्या पद्धतीने शहरात आला असून हिरावाडी परिसरातील पोलीस कर्मचारी आणि सातपूर परिसरातील महिला ही मालेगावहून नाशकात दाखल झाली आहे. सातपूर कॉलनीतिल 60 वर्षीय महिला नातेवाईकांसोबत कारने हॉटस्पॉट मालेगावहून नाशिकला परतलीय तर सिडकोतिल 39 वर्षीय पुरुष हा जळगावच्या भडगावहून दुधाच्या टँकरमधून छुप्या पद्धतीन नाशिकमध्ये दाखल झालाय. या दोन्ही रुग्णाच्या संपर्कांतील 28 नागरिकांना सध्या क्वॉरंटाईन केले गेले आहे. त्यांचे अहवालही चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शहरात आतापर्यंत 16 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 9 जण कोरोनाबाधित क्षेत्रातून आले असल्याने त्यांना बाधा झाली आहे आणि ही बाब नक्कीच गंभीर आहे.


CRPF | अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, दिल्लीतलं सीआरपीएफ मुख्यालय सील


लॉकडाउनमुळे जिल्हा बंदी करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांच्या हद्दीवर पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. मात्र, तरी देखिल नागरिक शहरात दाखल होत असल्याने पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नाशिक शहराला मालेगावचा सर्वाधिक धोका असून या ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंध करणे गरजेच आहे. नाहीतर अशाप्रकारे बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांमुळे संसर्ग वाढत गेला तर नाशिकचे मालेगाव होण्यास वेळ लागणार नाही हे नक्की.


Coronavirus | एक हजार खाटांचं रुग्णालय मुंबईच्या बीकेसीत उभारण्याचं काम सुरु