येवला : कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांचा रोजगार गेला तर अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला. मात्र, अशाही परिस्थितीत अंगी असलेल्या पाककलेतून येवल्यातील मेघा बाकळे या गृहिणाने पतीच्या सोबतीने हॉटेल व्यवसाय सुरु करत आत्मर्निभर होण्याचा प्रयत्न केला आहे.


येवला म्हटले की डोळ्यासमोर दिसते ते पैठणीचे शहर. मात्र, त्याच वेळी दुसरी ओळख आहे ती म्हणजे अस्सल सावजी मसल्याच्या पदार्थांपासून बनविलेल्या नॉन्व्हेज पर्दाथांची. सावजी मसाल्यापासून तयार होणारे नॉनव्हेज खाण्यासाठी अनेकजण बाहेर गावाहून याठिकाणी येत असतात. लॉकडाऊनच्या काळात पैठणीच्या व्यवसायात असणाऱ्या विणकरांची अवस्था मोठी बिकट झाली. अशा वेळी यातून बाहेर पडण्यासाठी मेघा बाकळे यांनी आपल्या अंगी असलेल्या पाकलेचा उपयोग करत पतीच्या मदतीने हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली.


घरी स्वतः सगळा मसाला तयार करत दोघे पती पत्नीने आपल्या हॉटेलमध्ये नॉनव्हेजची महाराजा आणि मान्यवर थाळी सुरु केली आहे. हॉटेल सुरु करताना सर्व पदार्थ कुठलेही कुक न ठेवता स्वतः बनवितात. माहेरी असलेल्या या पाककलेचा उपयोग सासरी आल्यानंतर होत असल्याने त्याचा फायदा आजच्या परिस्थितीला होत असल्याचं मेघा सांगतात. मेघा बाकळे यांच्या महाराजा थाळीमध्ये नॉनव्हेजचे जे प्रकार आहे, ते येवला शहरातील कुठल्याही हॉटेलमध्ये मिळत नाही.


लॉकडाऊन मुळे पैठणी विणकामावर परिणाम झाला. मात्र, पत्नीच्या पाककलेमुळे आज नवीन व्यवसाय सुरु केला असल्याची प्रतिक्रिया पती निलेश बाकळे यांनी दिली. खरं तर मोठ्या शहरात अशा प्रकारची थाळी मिळत असली तरी इथचं त्याचा अनुभव मिळत असल्याने आनंद होत असल्याचं स्थानिक खवय्ये सांगतात. एकंदरीतच लॉकडाऊनमुळे एका महिलेने आत्मर्निभर होत स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. त्याला आज यश येत असल्याने सध्या तो येवला शहरात चर्चेचा विषय बनला आहे.


काय आहे सावजी मसाला?
येवल्यातील क्षत्रीय समाजात सावजी मसाला अतियशय महत्वाचा असतो. प्रत्येक घरात हा मसाला तयार होतो. चवीला आगळा वेगळा असल्याने नॉव्हेजमध्ये त्याचा अधिक वापर होतो. त्यामुळे येवला शहरात सावजी मटन खानावळ असल्याने अनेकजण बाहेरगावाहून येत असतात.