सप्तश्रुंगी गडावर बंदुकीची गोळी लागून तीन भाविक जखमी
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2016 12:27 PM (IST)
नाशिक : सप्तश्रुंगी गडावर सुरक्षारक्षकाच्या हलगर्जीने बंदुकीतील गोळी तिघांना चाटून गेली. या अपघातात तीन भाविक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. विजयादशमीनिमित्त सप्तश्रुंगी गडावर बोकडबळी दिला जात होता. यावेळी सुरक्षारक्षक एक गोळी हवेत फायर करुन मानवंदना देतो. या परंपरेच्या वेळीच हा अपघात झाला. सुरक्षारक्षकाने झाडलेली गोळी भिंतीला धडकून परत आली आणि तीन जणांना चाटून गेली. यामध्ये तीन भक्त किरकोळ जखमी झाले आहेत.