मुंबई : नाशिकमधल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थाच उरली नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली.
'नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रात शांतता रहावी याची काळजी सरकारने घेणं गरजेचं आहे, मुळात राज्यात कायदा सुव्यवस्थाच शिल्लक राहिली नाही, त्यामुळे असे गुन्हे वारंवार होत आहेत. ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री तीच तीच प्रतिक्रिया देतात, जे बोलतात ते करत नाहीत, त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र अस्थिर झाला आहे', असं राणे म्हणाले.
नाशिकमधल्या तणावपूर्ण परिस्थितीसाठी राणेंनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना जबाबदार धरलं आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. येत्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असून अधिवेशन चालू देणार नसल्याचंही ते म्हणाले.
दुसरीकडे, सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनीही मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलं आहे. देवेंद्र फडणवीसांना अंतर्गत शत्रूंनी घेरलं आहे. सहकाऱ्यांवर विश्वास नसल्यामुळे त्यांनी गृहखातं स्वतःकडे ठेवलं आहे, अशा शब्दात
जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.