राज ठाकरेंनी उद्घाटन केलेल्या नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनमध्ये तोडफोड
एबीपी माझा वेब टीम | 06 Jan 2017 08:58 PM (IST)
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बोटॅनिकल गार्डनमध्ये तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. या गार्डनचं नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. लेझर शोच्या दरम्यान विनातिकीट गेलेल्या काही गुंडांनी तिकीट खिडकीची तोडफोड केली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातल्या सर्वात उंच अशा 100 फुटी कारंजा आणि बोटॅनिकल गार्डनमधल्या लेझर शोसह इतर विकासकामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हेही उपस्थित होते.