नाशिक : दामदुप्पट योजनेला बळी पडणाऱ्यांची नाशिकमध्ये फसवणूक झाली आहे. नाशिक शहरातील केबीसी फसवणूक प्रकरणानंतरही दामदुप्पट योजेनेच्या आमिषाला बळी पडून फसवणुकीचे प्रकार थांबलेले नाहीत.
कोपरगावच्या व्हिनस कॅपिटल कंपनीच्या माध्यमातून शेतकरी, शिक्षक, निवृत्त लष्करी जवान व्यावसायिक अशी अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. कोपरगावसह नाशिक, नगर, पुणे जिह्यातील असंख्य गुंतवणूकदार तक्रारीसाठी पुढे येत आहेत.
कोपरगावसह नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसातही फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस एकीकडे गुन्हे दाखल करत आहेत, मात्र दुसरीकडे छुप्या पद्धतीने बनावट नावाने कंपनीचा कारभार सुरु असल्याचा आरोप गुंतवणूकदार करत आहेत.
याप्रकरणी तीन संशयितांना कोपरगाव पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून पुढील तपास सुरु आहे.