CoronaVirus : कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये सुरुवातीपासूनच मास्कची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली होती. फॅब्रिक मास्क असो, किंवा मग मेडिकल फेस मास्क, प्रत्येक मास्कनं या संकटात अनेकांनाच सुरक्षित ठेवण्याचं काम केलं. कोरोनाचं संकट वाढत असतानाच आरोग्य यंत्रणा आणि जागतिक आरोग्य संघटनांकडूनही मास्क वापराचं आवाहन सर्वांनाच करण्यात येत आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेकडून नेमका कोणत्या मास्कचा वापर कधी केला पाहिजे याबाबतची अतीव महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. 


मेडिकल मास्क / सर्जिकल मास्क


मेडिकल, सर्जिकल मास्क आरोग्य कर्मचारी, कोविडची लक्षणं असणारे रुग्ण किंवा मग कोविडबाधितांची काळजी घेणाऱ्यांनी वापरावा. शिवाय 60 वर्षांवरील नागरिकही या मास्कचा वापर करु शकतात. 


Corona in India: ब्रिटनकडून भारताची 'रेड लिस्ट'मध्ये नोंद; प्रवाशांवर लावले निर्बंध 


फॅब्रिक मास्क 


कोविडची लक्षणं नसणाऱ्या व्यक्ती फॅब्रिक मास्क, अर्थात कापडी मास्क वापरु शकतात. ज्या भागात कोविडचा संसर्ग जास्त आहे, तिथं लक्षणं नसणारी मंडळी या मास्कचा वापर करु शकतात. तर, सोशल डिस्टन्सिंग शक्य नसणाऱ्या ठिकाणीही अशा मास्कचा वापर करता येऊ शकतो. इतरांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, बँक कर्मचारी, हॉटेलमध्ये काम करणारे वेटर आणि इतर कर्मचारी या मास्कचा वापर करु शकतात. त्याशिवाय बस, टॅक्सीने प्रवास करणाऱ्या व्यक्ती, नोकरीच्या ठिकाणी कर्मचारी, दुकानांमध्ये जाणाऱ्या व्यक्तीही फॅब्रिक मास्कचा वापर करु शकतात. 


In Pics | सुस्साट वेगानं 'ऑक्सिजन एक्सप्रेस' रुग्णांच्या मदतीसाठी हजर  






मास्कची विल्हेवाट लावणंही तितकंच महत्त्वाचं 


मेडिकल अथवा सर्जिकल मास्क हा एकदाच वापरता येतो. ज्यानंतर त्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. तर, फॅब्रिक किंवा कापडी मास्कचा पुन्हा वापर करता येऊ शकतो. यासाठी प्रत्येक वापरानंतर हा मास्क गरम पाण्यानं स्वच्छ धुवून, तो पूर्णपणे वाळवणं गरजेचं आहे.