नाशिक : पोलिस म्हणून काम करताना दबावाखाली आणि पक्षपातीपणे काम करु नका, छत्रपतीच्या मावळ्यांप्रमाणे जगा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस बांधवांना दिला. पोलिस उपनिरीक्षकपदी रुजू होणाऱ्या 115 नंबरच्या बॅचची पासिंग आऊट परेड आज नाशकात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली.
कर्तव्य पार पाडताना संवेदना जागृत ठेवा. अनेक वर्षे काम केल्यामुळे कोडगेपणा येऊ शकतो, मात्र तसं होऊ न देण्याची काळजी घ्या, कारण संवेदना आणि माणुसकी जागृत ठेवली नाही, तर तुम्ही सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
सेवा देण्यासाठी पोलिस दल आहे. सरकार जनतेचे विश्वस्त म्हणून काम करत आहे. अशावेळी मूल्यांची शिकवण आणि जपणूक महत्वाची असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. आपली प्रवृत्ती सबकुछ चलता है, अशी आहे, मात्र 'सबकुछ चलता नही' असे काम करण्याचा सल्लाही फडणवीसांनी दिला. आपलं दल शिस्तबद्ध आहे. शिस्त-संयमाबरोबरच तत्परता असली पाहिजे, याची जाणीवही मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.
सामान्य नागरिकांपेक्षा आपण वेगळे आहोत, हे भाव जागे ठेवा. पोलिस अधिकारी आपले मित्र आहेत, असे भाव जनतेमध्ये असू द्या, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.
आपल्या समोरचं ध्येय काय आहे, हे लक्षात ठेवा. छत्रपतीच्या मावळ्यांप्रमाणे जगा, पगारासाठी नाही, तर ध्येयासाठी काम करा, प्रलोभनांना बळी पडू नका, देशातील सर्वात चांगली पोलिस अकादमी आणखी चांगल्या प्रकारे कशी नावारुपाला येईल, याची काळजी घेण्याचा सल्लाही फडणवीसांनी दिला.
पोलिस उपनिरीक्षकपदी रुजू होणाऱ्या 115 नंबरच्या बॅचची पासिंग आऊट परेड आज नाशकात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर उपस्थित होते.
जवळपास 850 नवनियुक्त पीएसआयनी आज शपथ घेतली. शपथविधीसाठी बहुतांश अधिकाऱ्यांचे आई-वडीलही उपस्थित होते. हे सर्व अधिकारी आता राज्यभरातील पोलिस स्थानकात पदं सांभाळतील.
छत्रपतींच्या मावळ्यांप्रमाणे काम करा, मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना सल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Oct 2018 12:08 PM (IST)
पोलिस उपनिरीक्षकपदी रुजू होणाऱ्या 115 नंबरच्या बॅचची पासिंग आऊट परेड आज नाशकात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -