नाशिक : कारागृहातील सहा कैद्यांनीच दोन पोलीस शिपायांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील गुन्हेगारांनी पोलिसांना मारहाण केली.


 
तुरुंगातील सहा गुन्हेगारांना आज कोर्टात नेलं जाणार होतं. पण गाडीत बसायला जागा नसल्याने खासगी गाडीतून कोर्टात नेण्याची व्यवस्था करा, अशी मागणी आरोपींनी पोलिसांकडे केली.

 
पोलिसांनी ही मागणी मान्य न केल्यामुळे वैतगालेल्या कैद्यांनी थेट पोलिसांना मारहाण केलीय. त्यामुळे नाशिकमध्ये गुन्हेगारांना पोलिसांचं काहीच भय उरलं नाही का, असा प्रश्न उपस्थित होतोय.