नाशिक : प्रेमभंग झाल्याचं दु:ख न पचवू शकलेल्या एका माथेफिरु प्रियकरानं चक्क प्रेयसीच्या घरासमोरील दुचाकीच जाळून टाकल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. या आगीत जवळजवळ तीन दुचाकी जळून खाक झाल्या. मात्र, जवळच्याच सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद झाल्यानं नेमका प्रकार वेळीच उघडकीस आला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरु केला.

दरम्यान, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्यापूर्वीच सातपूर पोलिसांना आरोपीला अटक केली.