प्रेयसी आणि तिच्या आईच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 17 May 2016 03:44 PM (IST)
नाशिक: प्रेयसी आणि तिच्या आईकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका तरूणानं आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली आहे. विजय अहिरे असं आत्महत्या करणाऱ्या तरूणाचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत विजयनं प्रेयसी आणि तिच्या आईच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्रेयसी आणि तिच्या आईला अटक केली आहे. आपल्या मोहात फसवून प्रेयसी आणि तिच्या आईनं आपलकडे पैशाची मागणी केली. तसंच पैशाची मागणी पूर्ण न केल्यानं दोघींनी मारहाण केल्याचंही त्यानं चिठ्ठीत लिहीलं आहे. या चिठ्ठीवरुन मुलीला आणि आईला अटक करण्यात आली असून दोघींनाही 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.