नाशकात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, आर्ची-परशाचा काढता पाय
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 15 May 2016 04:48 PM (IST)
नाशिक : सैराटच्या चाहत्यांच्या हुल्लडबाजीमुळे आयोजित कार्यक्रम 2 मिनिटात गुंडाळण्याची नामुष्की नाशिकमध्ये आली. प्रेक्षकांच्या वेढ्यामुळे आर्ची-परश्याला काढता पाय घ्यावा लागला. धन्वंतरी कॉलेजच्या फॅशन शोच्या निमित्ताने 'सैराट' चित्रपटातील आर्ची-परशा म्हणजे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर नाशिकच्या चोपडा लॉन्सवर आले होते. पण आकाश आणि रिंकू मंचावर येताच त्यांना भेटण्यासाठी प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत स्टेजवर प्रवेश केला. त्याचवेळी बाऊंसर्सनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी वाढतच चालल्याने अखेरीस आयोजकांनी राष्ट्रगीत सुरु करुन, कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. दरम्यान या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी सभागृहाच्या बाहेर हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्याने काहीकाळ ट्रॅफिक जामही झालं होतं. सैराट फिल्म रिलीज होऊन दोन आठवडे झाल्यानंतरही यातल्या कलाकारांची क्रेझ कायम आहे आणि याचाच फटका नाशिकमधल्या या कार्यक्रमाला बसला.