नाशिक : वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जाळून तिची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नाशिक जिल्ह्यातही अशीच घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये बसस्थानकाजवळ शनिवारी संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुख्य संशयित अद्याप फरार असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बस स्थानकाजवळ उभी होती, त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या तीन जणांसोबत तिचा काहीतरी वाद झाला. विशेष म्हणजे वादानंतर महिलेने स्वतःच्या गाडीतून यावेळी पेट्रोलचा कॅन काढला आणि संशयितांसोबत झालेल्या झटापटीत पेट्रोलचा भडका उडाला. मात्र आग कुणी लावली याची अद्याप मिळालेली नाही. या घटनेत महिला 67 टक्के भाजली आहे. घटनेनंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला. उपस्थित नागरिकांच्या मदतीने पीडित महिलेला तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र पुढील उपचारासाठी तिला मुंबईच्या भायखळा येथील मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Hinganghat Women Ablaze | हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा मृत्यू
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती गंभीर असून ती 67 टक्के भाजली आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि त्यानंतर नाशिकमध्ये शनिवारी मुक्कामी असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची भेट घेत तिची विचारपूस केली. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शासन झालेच पाहिजे, मात्र सध्या ही महिला वाचणे गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. बाटलीत पेट्रोल मिळणे हा अपराधच असून असं पेट्रोल पंपावर होत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल
पीडित महिला सध्यातरी शुद्धीवर आहे. ती बरी होईल असं वाटतंय. आवश्यकता वाटल्यास तिला मुंबईला उपचारासाठी हलवण्यात येईल. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमधील कारणं वेगवेगळी असतात. मात्र अशा घटना घडू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.
Hinganghat Nirbahya | मी हिंगणघाटची लेक बोलतेय! जाता जाता काय म्हणाली निर्भया? स्पेशल रिपोर्ट