नाशिक: नाशिकमधील सिडको भागातील सभेत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरें यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. नाशिकमधील महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आदित्य यांनी मनसेला धारेवर धरलं.
‘निवडणुका आल्या की, नाशिकचा विकास केल्याची होर्डिंग संपूर्ण महाराष्ट्रात लावतात. पण नाशिकचा विकास हा फक्त होर्डिंगवरच आहे. नाशिकचा विकास केला तरी कुठे? असा सवाल विचारत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंच नाव न घेता निशाणा साधला.
‘नाशिकमध्ये आज आलो, गार्डन, चौक याबाबत विचारलं, तर हे सगळं होर्डिंगवर असून बाकी फक्त उल्लू बनाविंग. थापा मारणाऱ्यांना वैतागून मागील दीड वर्षात अनेक नगरसेवक शिवसेनेत आले. जगात असे कुठलेही शहर नसेल की, जिथं नगरसेवक सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात आले.’ अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवरही टीका
मनसेसोबतच आदित्य ठाकरेंनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. राज्याचे मुख्यमंत्री गुंडासोबत घेऊन प्रचारात फिरतात. गुंडासोबत हसत फोटो काढतात. नाहीतर कधीही हसत नाही. त्यामुळे भाजप हा गुंडांचा पक्ष आहे.
दरम्यान, उद्यापासून मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंच्या सभा सुरु होणार आहेत. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंच्या या टीकेला राज ठाकरे नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या:
राज ठाकरेंच्या मुंबईतील पहिल्या सभेची तारीख ठरली!
अमित ठाकरेंची फेसबुकवर एंट्री
महिलेला आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप, मनसे नगरसेवकावर गुन्हा
मुंबई महापालिकेसाठी मनसेची संपूर्ण यादी