नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर ते खेड हा 137 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे रटाळवाणा वाटणारा नाशिक-पुणे रस्तेप्रवास आता सुपरफास्ट होणार आहे.
हा नवा मार्ग खुला झाल्याने प्रवासाचा वेळ अर्ध्यावर आला आहे. पूर्वी जिथे सहा तासांचा वेळ लागत होता, तिथे आता केवळ तीन तासातच नाशिक ते पुणे अंतर कापता येणार आहे.
नाशिक-पुणे प्रवास म्हणजे कंटाळवाणा प्रवास मानला जायचा. त्रास नको म्हणून अनेक जण पनवेलमार्गे पुणे-नाशिक प्रवास करायचे.
कनेक्टिव्हिटी वाढून प्रगतीच्या दृष्टीने ही दोन्ही शहरं जवळ यावी, यासाठी नाशिक मुंबई, मुंबई, पुणे याप्रमाणे नाशिक-पुणे महामार्ग व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात होती. त्यामुळे उशिरा का होईना अखेर दोन्ही शहरांमधील प्रवाशांची इच्छा पूर्ण झाली आहे.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर भाग असलेल्या या रस्त्याचं काम आयएल अँड एफएस कंपनीने केलं आहे.
महत्त्वाचे मुद्दे
137 पैकी 104 किमी रस्त्याचे काम पूर्ण
76 टक्के काम पूर्ण झाल्याने रस्ता आणि पथकर वसुली सुरु करण्याचा निर्णय
पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामात 67 किमी नवीन रस्ता, 8 बाह्य वळण रस्ते, 5 घाट दुरुस्ती, 9 मोठे आणि 23 लहान पूल बांधले
8 ग्रेड सेपेरेटर, 32 ठिकाणी अंडरपास, ट्रक पार्किंगची व्यवस्था
2 ठिकाणी टोल नाके