एसटी आणि क्रुझरमध्ये भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 23 Jun 2018 03:44 PM (IST)
मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळी एसटी बस आणि क्रुझर गाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले आहेत, तर काही जण जखमी झालेत.
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळी एसटी बस आणि क्रुझर गाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले आहेत, तर काही जण जखमी झालेत. सटाणा तालुक्यातील किकवारी येथील लग्नाचे वऱ्हाड घेऊन क्रुझर गाडी नाशिकला जात होती. महामार्गावरील खडकजांब ते शिरवाडे फाट्यादरम्यान क्रुझर गाडीचे टायर फुटल्याने गाडी नाशिकहून नंदुरबारकडे जात असलेल्या एसटी बसवर जाऊन आदळली. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पिंपळगाव, चांदवड टोल नाका येथील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या. अपघातातील जखमींवर पिंपळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, तर काहींना उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आलं आहे. मृतांची नावे 1)रत्ना राजेंद्र गांगुर्डे 2) तेजश्री साहेबराव शिंदे 3) कृष्णाबाई बाळू शिंदे 4)धनुबाई केदा काकुळते 5)अशोक पोपट गांगुर्डे 6)सरस्वतीबाई नथू जगताप