75 वर्षीय वृद्धाकडून पत्नीची लाकडी दांडक्याने मारहाण करुन हत्या
एबीपी माझा वेब टीम | 18 Sep 2016 11:03 PM (IST)

नाशिक : 75 वर्षीय वृद्ध पतीने आपल्या पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केली आहे. नाशिकमधील अंबडमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. अंबडमधील चुंचाळे परिसरात रहिवासी असलेले सुधाकर साळवे आणि त्यांची पत्नी लीलाबाई साळवे यांच्यात काल मध्यरात्री काही वाद झाले आणि या वादातून सुधाकर यांनी आपल्या पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करायला सुरवात केली. यामध्ये लीलाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने, त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आज सकाळी उपचार घेत असताना लीलाबाई यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपी सुधाकर साळवेला पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा देखिल दाखल करण्यात आला आहे.