अपघात झाल्यांनतर मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांनी वाहनचालकाला बाहेर काढलं खरं पण नंतर मात्र जे झालं ते आश्चर्यकारक होतं. ही संपुर्ण गाडी देशी-विदेशी बनावटीच्या दारुच्या बॉक्सेसने भरलेली असून गाडीत गुजरात आणि नाशिक पासिंगच्या वेगवेगळ्या नंबरप्लेट असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं.
अवैध दारु तस्करीचा हा प्रकार असल्याची चर्चा सुरु झाली आणि वाहनचालकांने घटनास्थळावरुन पोबारा केला. ही बातमी कानोकान पसरली आणि तळीरामांनी अपघातस्थळी एकच गर्दी केली. प्रत्येक जण जास्तीच्या बॉटल कशा पळवता येतील, याचा प्रयत्न करत होता.
दारु पळवण्याच्या कसरतीत अनेकांची हमरीतुमरीही झाली. तळीरामांची ही लूट पाहण्यासाठी बघ्यांनीही गर्दी केली होती. दरम्यान या घटनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरुन होणारी अवैध दारुची तस्करी पुन्हा चर्चेत आली आहे.
पाहा व्हिडिओः