नाशिक : कांद्याला सध्या बाजारात चांगला भाव आहे. पण यामुळेच गेल्या काही दिवसात कांदा चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी २० ते २५ क्विंटल कांदा चोरुन नेल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या खेलदरी भागात घडली.
शेतकरी मोहन विलास जाधव यांनी आपल्या शेतात कांदा विक्रीसाठी काढून ठेवला होता. संक्रांतीच्या निमित्ताने दोन दिवस बाजार समितीला सुट्टी असल्यामुळे त्यांनी कांदे शेतातच ठेवले होते.
जाधव यांचं शेत चांदवड-देवळा मार्गावर रस्त्याच्या कडेलाच आहे. त्यामुळे चोरट्यांनी संधी साधत गोण्यांमध्ये भरुन कांदा चोरुन नेला. मात्र, सर्व गोण्या नेऊ न शकल्याने काही गोण्या रस्त्याच्या कडेला टाकून चोरट्यांनी पळ काढला.
यामुळे जाधव यांचं साधारण जवळजवळ 50 हजारांचं नुकसान झालं आहे. सध्या पोलीस या चोरट्यांच्या कसून शोध घेत आहेत.
शेतात काढून ठेवलेल्या 25 क्विंटल कांद्यांवर चोरट्यांचा डल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2018 07:54 PM (IST)
आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी २० ते २५ क्विंटल कांदा चोरुन नेल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या खेलदरी भागात घडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -