नाशिक :  श्रीराममंदिरात (Ram Mandir)  प्रतिष्ठापना झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati shivaji maharaj)  आठवण राममंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी काढली. त्यावर आज उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) प्रत्युत्तर दिले  आहे.   शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर  झाले नसते.  काल कोणीतरी म्हणाले छत्रपती म्हणजे आपले पंतप्रधान... मात्र पंतप्रधनांची तुलना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांशी कधीच होऊ शकत नाही.  छत्रपती होते म्हणून आज राम मंदिर उभे झाले, अशी प्रतिक्रया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. ते नाशिकमध्ये अधिवेशनात बोलत होते.


कालचा इव्हेंट झाला आता राम की बात करे,वारसे हक्काने हे शिवसैनिक मिळाले आहेत.  चोरून मला मिळाले नाहीत. मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून मी प्रचार केला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 


ईडीचा वापर घरगड्यासारखा : उद्धव ठाकरे 


शिवसेना नेत्यांच्या मागे लावलेल्या ईडी चौकशीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  आम्हीही तुमच्या चौकशा लावू आणि जेलमध्ये टाकणारच आहेत. कोविड काळातील घोटाळे काढतात. पीएम केअर फंडाचा घोटाळा काढा? पीएम केअर म्हणजे प्रभाकर मोरे फंड नाही. पंतप्रधान केअर फंड...खासगी फंड आहे असं सांगतात. पंतप्रधान गेल्यानंतर तुम्ही काय घेऊन जाणार आहात? घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडपासून सुरू झाली. अॅम्ब्युलन्स मध्ये 8 हजार कोटींचा घोटाळा केला. ईडीचा वापर घरगड्यासारखा करत आहे. आमच्याकडे द्या काही घरगडी...मग दाखवतोय.


तीस वर्षे सोबत राहून निर्लज्ज भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले काय होणार?


आम्हाला बोलतात काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसवाले झाले. तीस वर्षे सोबत राहून निर्लज्ज भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले काय होणार, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.


काय म्हणले गोविंददेव गिरी महाराज? ( Govinda Dev Giri Maharaj) 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तपश्चर्येचं कौतुक करताना गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. पंतप्रधानांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठासाठी सर्व नियमांचं पालन केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदींची तपश्चर्या आणि अनुष्ठान बघता ह्या परंपरेला साजेल असा एकच राजा होता तो म्हणजे राजा शिवछत्रपती.  पंतप्रधान मोदी यांना फक्त तीन दिवसांचा उपवास करण्यास सांगितले होते. पण त्यांनी 11 दिवसांचा उपवास केला. एखाद्या राष्ट्रीय नेत्यांनी एवढा त्याग करणे सोपं नाही. असा तपस्वी राष्ट्रीय नेता प्राप्त होणे ही काही सामान्य बाब नाही, असे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले. 



हे ही वाचा :


पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना, गोविंदगिरी महाराज म्हणाले....