Uddhav Thackeray Nashik Visit नाशिक : आगमी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन (State level convention) आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नुकतेच नाशिक विमानतळावर दाखल झाले आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचे जंगी स्वागत केले आहे. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत. 


अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला (Ayodhya Ram Mandir Inauguration) न जाता सोमवारी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. पंचवटीतील काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) ते आज सायंकाळी श्रीरामाचे पूजन करणार आहेत. नंतर ते रामकुंडावर गंगा पूजन करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 


काळाराम मंदिराचे घेणार दर्शन


आता उद्धव ठाकरे नाशिक विमानतळाहून भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला (Swatantra Veer Savarkar Smarak) अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. सायंकाळी पाच वाजता काळाराम मंदिरामध्ये (Kalaram Mandir) जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेणार आहेत. तसेच यावेळी महाआरती देखील करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता उद्धव ठाकरे गोदा आरती करणार आहेत. 


उद्या उद्धव ठाकरेंची जाहीर सभा


दि. 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन (Shivsena UBT State Level Convention) आयोजित करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.  याच दिवशी सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होईल. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाहीर सभेत कुणावर तोफ डागणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


...म्हणून घेणार काळाराम मंदिराचे दर्शन


देशातील वातावरण बदलण्यासाठी सुरवात करण्यासाठी उद्या अधिवेशन घेत आहोत. जेवढे महत्त्व अयोध्येला आहे तेवढेच नाशिकच्या पंचवटीला आहे. अयोध्येत  श्री राम राजा तर येथे त्यांना त्याग, संघर्ष करावा लागला म्हणून आम्ही संघर्ष करणाऱ्या रामाच्या पंचवटीमधील काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


अयोध्येत आज राजकीय इव्हेंट, ते करण्यात भाजपचा हात कुणीच धरु शकत नाही : संजय राऊत


Kalaram Mandir : काळाराम मंदिरात आकर्षक द्राक्षांची सजावट; दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा